vilas thuseVilas thuse

विलास ठुसे

विलास ठुसे : एक हरहुन्नरी मनुष्य!
पुणे तिथे काय उणे? ७५ निरांजनांच्या ताटापासून (Spanish) ‘झारा’च्या स्कर्टापर्यंत सगळं मिळतं! मग अभियांत्रिकी शिक्षण घेउन अमेरिकेत स्थायिक झाल्यावर पौरोहित्य शिकणारा पंडित तिथे ‘पैदा’ झाला तर नवल नाही! त्याचं असं झालं…
श्री.विलास ठुसे मूळचे संगमनेरचे, परंतु शिक्षण पुण्याचे. पुणे, धरणगाव, प्रताप कॉलेज, कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे ही महाराष्ट्राशी दृढ नाते सांगणारी नावं (आणि गावं) उच्चारत संभाषणाला सुरुवात झाली. योग्य शिक्षण, मेहनत, नशीब याशिवाय यशस्वी होण्यासाठी एक वेगळाच गुण लागतो – आयुष्याकडे चाकोरीबाहेरून बघण्याचा.
Read more

abhi gholapAbhijeet Gholap

अभिजित घोलप

“अजि म्या ब्रह्म पाहिले”……. च्या चालीवर; “आज मी ‘Midas’ शी बोललो”…… अशी काहीशी माझी अवस्था, “अभी”शी बोलल्यावर झाली होती.
अभिजित घोलप……. हा माणूस IIT (मुंबई) इथून graduate होतो काय……. अमेरिकेत येऊन नाममात्र भांडवलावर Bio Imagene कंपनी सुरु करतो आणि अवघ्या दहा वर्षात hundred million पर्यंत वाढवतो काय……. काही वर्षांसाठी भारतात परत जातो आणि सिनेमा निर्मितीसारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात पदार्पणातच ‘देऊळ’ सारख्या अभिजात कलाकृतीची निर्मिती करतो काय……

Read more

mukund maratheMukund Marathe

मुकुंद मराठे

पुरे झाली आता तुझी नाटकं. तेच लक्ष जरा अभ्यासात घाल”. असं “प्रोत्साहन” जर घरच्यांकडून मिळालं असतं तर मुकुंद मराठे या रंगयात्रीची नाट्यप्रेमाची हरळी बालपणीच उपटली गेली असती. पण सुदैवाने तसं झालं नाही; त्यामुळे बे एरीयातल्या लोकांना एक धडपड्या, नाटकांना वाहून घेतलेला अभिनेता, दिग्दर्शक, समन्वयक अशा एकापेक्षा एक विविध रुपात मुकुंद मराठे बघायला मिळाला. मुकुंदच्या मातोश्री स्वतः उत्तम लेखिका, घरात नाटकांविषयी, संगीताविषयी पोषक वातावरण अशा कलासक्त पार्श्वभूमीचा कळत नकळत परिणाम मुकुंदमधील कलाकाराच्या जडणघडणीवर होत होता.

Read more

Prakash ZotatDr.Makarand Gore

डॉ. मकरंद गोरे

डॉ. मकरंद गोरे…… अडीचशेच्या वर शोध निबंध, पंचावन्नच्या वर पेटंटस, Hewlett-Packard ची अकरा स्टार ऍवार्ड्स आणि इतर बरंच काही… असा ढाई किलोचा resume वाचला की जरा दडपायलाच होतं. मुलाखत घ्यायच्या आधी जरा तयारी करावी म्हणून साहेबांच्या Linked-In च्या पानावर त्यांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला……
जुन्या अकरावीची शेवटची बॅच व नवीन बारावीची पहिली बॅच एकत्र आल्याने विद्यार्थी तर वाढलेले होते पण मेडिकलच्या सीट्स तर काही वाढलेल्या नव्हत्या. त्या गोंधळात मेडिकलची ऍडमिशन एका मार्काने हुकलेली…. त्यानंतर आलेली उद्विग्नता, झालेली चिडचिड आणि त्यातूनच केलेला दृढनिश्चय – मी डॉक्टर तर होईनच पण त्यापुढेही जाईन….

Read more

subhashMr.Subhash Gaitonde

श्री.सुभाष गायतोंडे

It gives us great pleasure to introduce Shree. Subhash Gaitonde: an enterprising builder, avid BMM-goer, and an ardent devotee of classical music. He came to Seattle in 1970 to study architecture; a field less inhabited by immigrants even now.

Read more

shubhada-300x300Shubhada Kamerkar

शुभदा “शुबी” कामेरकर

“टवाळा आवडे विनोद” असं संत रामदास नाराजीच्या सुरात म्हणाले असले तरी आपल्याला सर्वांना टवाळक्या करायला आवडतात! “फक्त आपण टवाळक्या करतो हे इतरांना कळलेले आपल्याला आवडत नाही…” हे बोलताना शुभदाताईंनी मारलेला डोळा मला फोनवरून देखील दिसला. २०११ साली डेट्रॉइटच्या रंगमंचावर पाहिलेला त्यांचा हसरा चेहरा लगेच माझ्या डोळ्यासमोर आला. ‘उभ्या उभ्या विनोद’ हा stand up comedyचा मराठी (“सोवळा”) अवतार. दिवाळीचं पावित्र्य, मराठी माणसाची मानसिकता आणि प्रसंगाचं औचित्य यांचं भान ठेवून शुभदा कामेरकर यांनी त्यांच्या चमूसह केलेले विनोद डेट्रॉइटकरांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते …

Read more

AtulGovande-300x300Atul Govande

श्री. अतुल गोवंडे

“मुलाखत घेऊ का हे विचारणारी तुमची इमेल आली तर मला आधी वाटलं SPAM आहे की काय…” या त्यांच्या मिश्किल विधानाने आमच्या गप्पांना सुरुवात झाली.
त्यांचा जन्म जमशेदपूरचा, शिक्षण व वास्तव्य पुण्यात. १९९२ साली प्रशिक्षणानिमित्त ते डेल्टा टाउ या कंपनीत आले आणि इथल्या कामाच्या पद्धतीवर खूष झाले. अमेरिकेत यायचं यापेक्षा या कंपनीत यायचं असा ध्यास त्यांनी घेतला. परंतु ती इच्छा पूर्ण होइपर्यंत १९९७ साल उजाडले.

Read more